हातनोलीतील सावकार पती-पत्नीला अटक नाही

तासगाव हातनोली (ता. तासगाव) येथील खासगी सावकार शिवाजी नारायण जाधव व त्याची पत्नी कृषी सहाय्यक श्रद्धा शिवाजी जाधव यांच्याविरोधात तासगाव पोलिसात गुन्हा नोंद झाला असला तरी, त्यांना अद्याप अटक नाही.
by: अन्वर इनामदार


loading


हातानोली (तासगाव) (१५ disembar) - हातनोली (ता. तासगाव) येथील खासगी सावकार शिवाजी नारायण जाधव व त्याची पत्नी कृषी सहाय्यक श्रद्धा शिवाजी जाधव यांच्याविरोधात तासगाव पोलिसात गुन्हा नोंद झाला असला तरी, त्यांना अद्याप अटक करण्यात आली नसल्याची माहिती देण्यात आली.

खासगी सावकार शिवाजी व त्याची पत्नी श्रद्धा यांनी गावातील ज्वेलरी व्यावसायिक महात्माजी निवृत्ती निकम यांना सन २१ मध्ये पाच लाख रुपये कर्ज दरमहा वीस टक्के व्याजाने दिले होते. सावकार शिवाजी व त्याची पत्नी श्रद्धा यांनी पाच लाख कर्जापोटी महात्माजी यांच्याकडून ४० लाख रुपये व्याज व चक्रवाढ व्याज आकारून वसुली केली आहे. शिवाय आणखी एक कोटी २० लाख रुपये वसूल करण्यासाठी सावकार शिवाजी व श्रद्धा यांनी महात्माजी निकम यांच्याकडे तगादा लावला होता.

त्यासाठी शिवाजी आणि श्रद्धा यांनी महात्माजी यास मारहाण करणे, धमकी देणे, जिवे मारण्याची धमकी देणे, तसेच तू पैसे दे नाही तर मर, अशी चितावणी देऊन आत्महत्या करण्यास प्रवृत करण्याचा प्रकार केला होता. शिवाजी याच्या त्रासाला कंटाळून महात्माजी यांनी विषारी द्रव पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.

यातूनच सावकार शिवाजी व त्याची पत्नी श्रद्धा यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल होऊनही सावकार पती-पत्नी यांना अजून अटक झाली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.