हिंगोली येथे स्वत:चे आई-वडील आणि भावाला ठार मारले

स्वत:चे आई-वडील आणि भावाला ठार मारून अपघातचा बनाव रचला
by: प्रतिनिधि


loading


हिंगोली (१६ जानेवारी) - हिंगोली जिल्ह्यातील डिग्रस वाणी गावामध्ये स्वतःच्याच मुलाने आई वडील आणि भावाला ठार मारून अपघात केल्याचा बनाव केला होता. या प्रकरणी आरोपी महेंद्र जाधव याला आज बासंबा पोलिसांनी हिंगोलीच्या न्यायालयामध्ये हजर केले असता हिंगोली कोर्टाने त्याला पुढील चार दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.

दृश्यम चित्रपट पाच वेळा पाहून आणि क्राईम पेट्रोलचे अनेक एपिसोड्स पाहून मुलाने त्याच्या आई -वडिलांची आणि भावाची हत्या केली होती. चहातून विष देऊन आणि विजेचा शॉक देऊन ही हत्या केली होती. काही दिवसापूर्वी डिग्रस वाणीच्या शिवारामध्ये दुचाकीच्या अपघातात आई-वडील आणि मुलाचा मृत्यू झाला होता. मृतांची नावे कुंडलिक जाधव, कलावती जाधव आणि मुलगा आकाश जाधव अशी होती. मात्र हा अपघात नसून अपघाताचा बनाव असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं. मयत जोडप्याच्या दुसऱ्या मुलानेच म्हणजे महेंद्र जाधव याने आई-वडील आणि भावाची हत्या करुन अपघाताचा बनाव रचला. आई वडील आणि भाऊ पैसे देत नसल्याच्या रागातून महेंद्रनं हे संतापजनक कृत्य केलं. महेंद्रविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संशय आल्याने केली चौकशी
हिंगोली जिल्ह्यातील डीग्रसवाणी या गावलागत ११ जानेवारीला वळणालगत एक अपघात झाल्याची घटना घडली होती. या मोटासायकल अपघातात कुंडलिक जाधव, कलावती जाधव आणि आकाश जाधव यांचा मृत्यू झाला होता. ही माहिती संशयित आरोपी महेंद्र जाधव याने स्वतः पोलिसांना दिली त्यावरून पोलिसांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली परंतु अपघातस्थळी अपघात नसून अपघाताचा बनाव केला जात असल्याचा संशय पोलिसांना आला. त्यावरून पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. तर मृत दाम्पत्याचा मुलगा आणि मयत आकाशचा भाऊ महेंद्र जाधव वारंवार अपघाताचा गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांना तागादा लावत होता.

तब्बल पाच वेळा पाहिला दृश्यम चित्रपट पाहिला
पोलिसांना दिलेल्या माहितीमध्ये घडलेल्या घटनेत साम्य आढळतं नव्हते. त्यामुळे पोलिसांना महेंद्रवर संशय आला आणि पोलिसांनी महेंद्र जाधवला चौकशी साठी ताब्यात घेतले. आरोपीला विश्वासात घेत पोलिसांनी अधिक चौकशी केली असता आरोपी महेंद्र जाधवला त्याच्या आई वडील कलावती जाधव आणि कुंडलिक जाधव हे पैसे देत नव्हते. भाऊ आकाश जाधव सुद्धा नातेवाईकांमध्ये त्याचा अपमान करत असे त्यामुळे स्वतःच्याच आई-वडील आणि भावाला मारून टाकण्याचा कट त्याने दिवाळीपासून रचला होता. त्यासाठी महेंद्र जाधव ने दृश्यम हा चित्रपट तब्बल पाच वेळा पाहून आणि क्राइम पेट्रोलचे अनेक भाग पाहून खून करण्याचं ठरवलं.

झोपेच्या गोळ्या देऊन डोक्यामध्ये रॉडने केले वार
ठरलेल्या प्लॅनिंगनुसार महेंद्र जाधवने स्वतःच्या आई-वडील पैसे देत नाहीत आणि नातेवाईकामध्ये सतत बदनामी करतात. हा राग मनात धरून 9 जानेवारी रोजी रात्री भावाला झोपेच्या गोळ्या दिल्या. त्यानंतर त्याला विजेचा शॉक दिला तरीही मात्र आकाश जाधव जिवंत आहे हे कळल्यानंतर त्याने त्याच्या डोक्यात रोड घालून खून केला. त्यानंतर त्याची बॉडी रोडलगत असलेल्या नाल्यामध्ये टाकली. 10 जानेवारीला दुपारी त्याची आई कलावती जाधवला सुद्धा झोपेच्या गोळ्या देत शेतामध्ये नेत डोक्यामध्ये रॉडने वार करत तिचा सुद्धा खून केला. परत बॉडी रोडलगत त्याच ठिकाणी नेऊन टाकली. त्यानंतर मध्यरात्री वडील कुंडलिक जाधव यांना सुद्धा झोपेच्या गोळ्या दिल्या आणि डोक्यामध्ये रोडचा वार करत खून केला. मृतदेह परत त्याच ठिकाणी रोडच्या लगत असलेल्या नाल्यात आई आणि भावाच्या मृतदेहाजवळ ठेवून दिला आणि त्या ठिकाणी अपघात केल्याचा बनाव केला. आरोपी महेंद्र जाधव मागील दोन तीन महिन्यापासून कोणतेही काम करत नव्हता व तो घरीच होता.