पांडुरंग सोमनिग कळळी येथील बलात्कारी नराधमाला फाशी झाली पाहिजे
गुन्हेगारांच्या मनात कायद्याची भीती उरली नाही - अनवर इनामदारby: सुदाम पेंढारे
तासगाव (७ फेब्रुवारी २०२५) - मोजे करजगी तालुका जत जिल्हा सांगली येथील पांडुरंग सोमनिग कळळी या नराधमाने एक भ्याड कृत्य केले आहे. अवघ्या चार वर्षाच्या निष्पास बालके वर अत्याचार करून मग त्याची निर्दयी हत्या करण्यात आली. त्याचे तीव्र प्रसाद महाराष्ट्रभर उमटले आहेत.
सदर आरोपीला लवकरात लवकर व काठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे कोणत्याही प्रकारची सहानुभूती न दाखवता तसेच कोणत्याही प्रकार ची सुनावणी न करता सत्वर त्या नराधमास फाशी शिक्षा देऊन एक आगळा ठसा व कायद्याचा वचक शासनाने निर्माण करावा असे आव्हान आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष अन्वर इनामदार यांनी केले आहे.
याबाबतीत बोलताना मानवाधिकार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अन्वर इनामदार म्हणाले की आज समाजामध्ये अशा घटना सर्रास घडत आहेत. विकृत लोकांच्या मनावर कायद्याचा वचक बिलकुल राहिलेला नाही. कुणीही उठून काहीही करण्यास धजवत आहे. ही चिंतेजी बाब आहे शासनाने याबाबतीत विशेष लक्ष घालून गुन्हेगारांच्या मनात कायद्याचा वचक निर्माण केला पाहिजे.
याबाबतीत या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघटनेने आज या विषयीचे निवेदन मा. ना.देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य याना तासगाव तालुक्याचे तहसीलदार अतुल पाटोळे यांच्याकडे सुपूर्त केले आहे. यावेळी ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे आलमशा मोमीन, तासगावचे सामाजिक कार्यकर्ते निसार मुल्ला, केंद्रीय पत्रकार संघाचे विशाल टेके, शहराध्यक्ष भानुदास पाटील, श्रीधर माने, अशपाक मुल्ला, शकील शेख, बाबासाहेब जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.