आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे सांगली जिल्हा अध्यक्ष श्री अन्वर इनामदार साहेब यांचा वाढदिवस उत्साहात साजरा .
श्री अन्वर इनामदार यांनी सर्व उपस्थितांचा शुभेच्छा स्वीकारून मनःपूर्वक आभार मानले.by: कृष्णा म्हेत्रे

तासगांव (सांगली) (७ जुलै २०२५) - तासगाव तारीख ६ जुलै २०२५ आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष व तुरचीचे सुपुत्र श्री. अनवर इनामदार यांचा वाढदिवस आज मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने स्टेशन रोडवरील भारत पेट्रोलियमच्या पंपावर छोटासा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यानिमित्ताने मानव अधिकार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष श्री कृष्णा म्हेत्रे, व सांगली जिल्हा उपाध्यक्ष डॉ. विद्यासागर कांबळे, सांगली जिल्हा समन्वयक डॉ. संजय देवकुळे, जिल्हा सहसचिव दीपक पाटील, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे सांगली जिल्ह्याचे प्रेस सेक्रेटरी गौस नदाफ , मिरज तालुका सचिव रणधीर कांबळे सहसचिव वसंत खांडेकर,मिरज तालुका समन्वयक सतीश कांबळे, नूतन सदस्य किरण भंडारे , रिपब्लिकन पार्टीचे ऑफ इंडिया ( गवई गट ) जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय माने ,पलूस तालुका उपाध्यक्ष अमोल लाड, तासगाव तालुका अध्यक्ष विकास खबाले, तालुका सहसचिव सुनील लोहार, तालुका सचिव विशाल टेके, तसेच सहसचिव श्रीधर माने, ग्राहक पंचायत महाराष्ट्र विभाग पूणेचे सहसंघटक अलमशहा मोमीन, ध्वनी शास्त्रज्ञ मा. अब्दुलरहीम मुल्ला, सिकंदर मुल्ला, दिलावर मुल्ला गुरुजी, अशोक हिरगुडे, दिलीप कांबळे, यांच्यासह अन्वर इनामदार यांचा मित्रपरिवार मोठ्या प्रमाणात उपस्थित होता .
या सर्वांनी अन्वर इनामदार यांना शुभेच्छांचा वर्षाव केला या ठिकाणी केक कापून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. लवकरच आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघटनचे जिल्हास्तरीय अधिवेशन व आरोग्य शिबिर आयोजित करत असल्याचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा म्हेत्रे यांनी यावेळी जाहीर केले.
या सत्काराला उत्तर देताना श्री अन्वर इनामदार यांनी सर्व उपस्थिताना आषाढी एकादशी व मोहरम या उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि सर्व उपस्थितांचा शुभेच्छा स्वीकारून मनःपूर्वक आभार मानून सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.