भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३४व्या जयंती निमित्त धान्य व फळ वाटप करून साजरा केला
जयंती उत्साहात संपन्नby: सुदाम पेंढारे

तासगाव (१४ एप्रिल २०२५) - आज आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघटना सांगली जिल्हा यांच्या वतीने १३४व्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त राशन व फळे वाटप करून साजरा कारण्यात आला. यावेळी मदतीच्या दृष्टीने वृद्धाश्रमातील लोकांना काही अडचणीं विषयी विचारपूस करण्यात आली.
यावेळी आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघटनेचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा म्हेत्रे, यांनी सर्वाना शुभेच्छा दिल्या. सांगली जिल्हा अध्यक्ष अनवर इनामदार यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४व्या जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. व काही अडचणी आल्यास नक्कीच आमच्याशी संपर्क असे आवाहन केले.
सदर प्रसंगी तालुका सदस्य क्षितिज देवकुळे यांनी देखील आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघटनेच्या कार्यपद्धती बद्दल माहिती दिली,
सोबत घाटमाथा चायनल चे पत्रकार शकील मुल्ला, अविनाश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.