वसंत अण्णा खांडेकर यांच्या दोन वर्षांच्या पाठपुराव्याला यश
by: अन्वर इनामदार


loading


मिरज (2025-09-12) - सांगली (दि. 11 सप्टेंबर 2025) मालगाव या गावासाठी ग्रामसचिवालयाची स्वतंत्र जागा मिळविण्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. अखेर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघटना मिरज तालुका जॉईंट सेक्रेटरी श्री. वसंत अण्णा खांडेकर यांच्या अथक प्रयत्नांना यश मिळाले असून महाराष्ट्र शासनाकडून 14 गुंठे जागा ग्रामसचिवालयासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

दीड-दोन वर्षांची जिद्द
या जागेसाठी गेली जवळपास दोन वर्षे श्री. खांडेकर यांनी सलग पाठपुरावा केला. संबंधित कागदपत्रे काढणे, शासकीय कार्यालयांमध्ये वारंवार संपर्क साधणे, आवश्यक त्या स्तरावर चर्चा करणे या सर्व गोष्टी त्यांनी स्वतः हाती घेतल्या. शासन मूल्यांकन दराप्रमाणे 35 लाख 42 हजार रुपये व मुद्रांक शुल्क 2 लाख 12 हजार 600 रुपये माफ करून ही जागा ग्रामपंचायतीसाठी मिळविण्यात आली.

आदेश ते ताबा – संपूर्ण प्रक्रिया
2 जून 2025 : जिल्हाधिकारी सांगली यांचा आदेश.

1 सप्टेंबर 2025 : करारनामा पूर्ण.
10 सप्टेंबर 2025 : जागेची मोजणी व प्रत्यक्ष ताबा.
11 सप्टेंबर 2025 : भूमी अभिलेख कार्यालय सांगलीकडून फेरफार व मालमत्ता पत्रकीत ग्रामसचिवालयासाठी नोंद.
या प्रक्रियेद्वारे अखेर ग्रामसचिवालयासाठी स्वतंत्र व कायमस्वरूपी जागा उपलब्ध झाली.

प्रशासनाचा मोठा सहभाग
या कार्यात जिल्हाधिकारी कार्यालय सांगली, जिल्हा परिषद सांगली, पंचायत समिती मिरज, तहसीलदार कार्यालय मिरज, उपविभागीय अधिकारी मिरज, गट विकास अधिकारी कार्यालय, मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय सांगली, उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय सांगली तसेच दुय्यम निबंधक कार्यालय मिरज यांचे सहकार्य लाभले.

नागरिकांचा आनंद व कौतुक
गावातील व जिल्ह्यातील नागरिकांनी श्री. वसंत अण्णा खांडेकर यांच्या या कार्याचे मनापासून कौतुक व अभिनंदन केले आहे. ग्रामसचिवालयासाठी मिळालेली जागा ही गावाच्या विकासासाठी नवी दिशा दाखवणारी ठरेल, असे मत स्थानिकांनी व्यक्त केलं.