रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा अमित (विशाल) पाटील यांना संपूर्ण ताकदीने जाहीर पाठिंबा
येळावी गटात काँग्रेसचा विजय निश्चित?by: अन्वर इनामदार
तासगाव (१ फेब्रुवारी २०२६) - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सचिव माननीय डॉ. राजेंद्र गवई साहेब यांच्या आदेशानुसार व सांगली जिल्हा प्रभारी श्री. हेमंतजी भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व मित्र पक्षांच्या सर्व उमेदवारांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने बिनशर्त जाहीर पाठिंबा दिला आहे, अशी माहिती आज सांगली जिल्हा सचिव श्री. गौस नदाफ यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तासगाव तालुकाध्यक्ष श्री. शंकर तांदळे, सांगली जिल्हा कार्याध्यक्ष श्री. राकेश कांबळे,
सांगली जिल्हाध्यक्ष श्री. दत्तात्रय माने,,जिल्हा सदस्य श्री.अन्वर इनामदार यांची प्रमुख उपस्थिती होती. या निर्णयासंदर्भात आज वासुंबे येथे अधिकृत निवेदनही सादर करण्यात आले.
यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने येळावी जिल्हा परिषद गटातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व मित्र पक्षांचे उमेदवार श्री. अमित (विशाल) विजयाराव पाटील यांना जाहीर पाठिंबा देण्यात येत असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली.
येळावी गटाचा सर्वांगीण विकास, पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त कारभार तसेच लोकाभिमुख प्रशासनासाठी श्री. अमित (विशाल) विजयाराव पाटील हेच योग्य, सक्षम व विश्वासार्ह उमेदवार आहेत, असा ठाम विश्वास व्यक्त करत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने त्यांना संपूर्ण ताकदीने पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
तसेच येळावी जिल्हा परिषद गटातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्व पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार अमित उर्फ विशाल पाटील यांना सक्रिय सहकार्य करून त्यांच्या विजयासाठी पूर्ण ताकदीने काम करावे, असे आवाहन सांगली जिल्हा सचिव श्री. गौस नदाफ यांनी केले.