✒️कलबुर्गी येथे डॉ. क्षितिज देवकुळे यांची डेंटल क्लिनिक ऑफिसर पदावर निवड
या यशाबद्दल सांगली जिल्हा मानवाधिकार संघटनेतर्फे देवकुळे परिवाराचे हार्दिक अभिनंदनby: अन्वर इनामदार

तासगाव (२२ सप्टेंबर २०२५ ) - आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघटनेचे सांगली जिल्हा समन्वयक डॉ. संजय देवकुळे यांचे चिरंजीव डॉ. क्षितिज संजय देवकुळे यांची कलबुर्गी (कर्नाटक) येथील ईएसआयसी हॉस्पिटल व कॉलेज येथे डेंटल क्लिनिक ऑफिसर या पदावर निवड झाल्याची आनंदवार्ता नुकतीच जाहीर झाली आहे.
या यशाबद्दल सांगली जिल्हा मानवाधिकार संघटनेतर्फे देवकुळे परिवाराचे हार्दिक अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
विशेष आभार व्यक्त करताना संघटनेचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष मा. कृष्णा नाना म्हेत्रे यांनी आपल्या मनोगतात देवकुळे परिवाराच्या कार्याची प्रशंसा केली.
या प्रसंगी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनवर इनामदार, जिल्हा प्रेस सेक्रेटरी गौस नदाफ, तसेच तासगाव तालुका सचिव विशाल टेके यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.