“ध्वनी शास्त्राचा ५० वर्षांचा अभ्यास - अब्दुलरहीम मुल्ला यांचे उल्लेखनीय कार्य

ध्वनी शास्त्राचे अभ्यासक – अब्दुलरहीम इब्राहिम मुल्ला
by: अन्वर इनामदार


loading


तासगाव (2025-09-13) - सांगली तासगाव :(13/09/2025) तासगाव तालुक्यातील आरवडे गावचे रहिवासी अब्दुलरहीम इब्राहिम मुल्ला हे नाव ध्वनीशास्त्राच्या अभ्यासाशी घट्ट जोडले गेले आहे. साधी शैक्षणिक पात्रता असूनही त्यांनी आपल्या चिकाटीने, जिज्ञासू वृत्तीने आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांनी गेली ५० वर्षे ध्वनी शास्त्राचा सखोल अभ्यास केला आहे.*

ध्वनी आणि त्यातून निर्माण होणाऱ्या लहरी मानवी जीवनावर किती खोलवर परिणाम करतात, याचा शोध घेऊन त्यांनी हजारो लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणले आहेत. त्यांच्या प्रयोगांमुळे माणसाच्या मानसिक, सामाजिक व कौटुंबिक आयुष्यात नवा आशावाद निर्माण झाला आहे.

*“समाजाचं काही देणं आहे” या भावनेतून त्यांनी ध्वनी शास्त्राच्या माध्यमातून सतत नवनवीन प्रयोग केले. ध्वनीच्या शक्तीचा उपयोग करून माणसांच्या जीवनातील तणाव कमी करता येतो, नाती अधिक सुदृढ होतात आणि व्यक्ती सुखी जीवनाकडे वाटचाल करू शकते, हे त्यांनी सिद्ध केले आहे.*

आजवर हजारो कुटुंबांना त्यांनी ध्वनी शास्त्राच्या माध्यमातून आधार दिला आहे. पुढेही या शास्त्राचा अधिक गाढा अभ्यास करून समाजासाठी आणखी उपयुक्त ठरेल असे कार्य करण्याचा त्यांचा संकल्प आहे.

*अल्पशिक्षित असूनही जिद्द, चिकाटी आणि सेवाभावाच्या बळावर त्यांनी घडवलेली ही जीवनयात्रा खरोखर प्रेरणादायी आहे.