डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम शाळेत पैगंबर जयंती

विज्ञानाची जाणीव जागृत करण्याचा प्रयत्न
by: राकेश कांबळे


loading


तासगाव (9 सप्टेंबर 2025) - डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम प्राथमिक उर्दू शाळा, तासगाव येथे मुहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त शालेय विद्यार्थ्यांना जिलबी वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला.

यावेळी आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघटनेचे सांगली जिल्हा अध्यक्ष अनवर इनामदार यांनी शाळेने पुढील काळात विज्ञान प्रदर्शन भरवावे, असे आवाहन केले. ते म्हणाले की, “आजच्या विद्यार्थ्यांनी विज्ञानवादी होणे ही काळाची गरज आहे. प्रयोगशीलता आणि वैज्ञानिक दृष्टी विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी अत्यावश्यक आहे.”

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनवर इनामदार, सांगली जिल्हा प्रेस सेक्रेटरी गौस नदाफ, शाळेचे मुख्याध्यापक गुलाबहुसेन नदाफ तसेच शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.