तासगाव शहरात लाईफ केअर मल्टी स्पेसियालीटी हॉस्पिटलचे तृतीय वर्धापण दिनानिमित्त,पन्नासटक्के सवलतीत आरोग्य शिबीर.
सामाजिक बांधिलकी जपतby: अन्वर इनामदार
Tasgaon (2024-10-03) - लाईफकेअर हॉस्पिटलच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत, हॉस्पिटलमध्ये मेडिसिन विभागामध्ये 50% सवलतीत आरोग्य सप्ताह शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर दिनांक 1 ते 7 ऑक्टोंबर 2024 या कालावधीमधे आहे.
सदर आरोग्य शिबिरामध्ये सात दिवस एमडी मेडिसिन तज्ञ, डॉ .सुधाकर हे रुग्णांची तपासणी व त्यांच्यावर उपचार करणार आहेत.
या आरोग्य सप्ताह शिबिरामध्ये मेडिसिन विभागाच्या ओपीडी, आयपीडी, आयसीयू, लॅब व एक्स-रे च्या संपूर्ण बिलावर 50% सवलत असणार आहे. म्हणजे रुग्णांनचे अर्धे बिल माफ होणार आहे.
शिबिरामध्ये डेंगू ,निमोनिया, टायफाॅईड, दमा, कावीळ, पोटाचे विकार, शुगर, ब्लड प्रेशर, हार्ट अटॅक उपचार, गोचीड ताप, मलेरिया, सर्पदंश, औषध विषबाधा, फुफुसाचे विकार, अर्धांग वायू, तापातील झटके तसेच सर्व प्रकारच्या अत्यावश्यक चिकित्सान वरील अत्याधुनिक उपचार पद्धतींचा समावेश सवलतीत उपलब्ध असेल.
हॉस्पिटलमध्ये दहा बेडचे सुसज्ज आयसीयू असून 40 बेड इतर रुग्णांसाठी आहेत. तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रियांसाठी डोळ्यांचा विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, सर्जरी विभाग, लहान मुलांचा विभाग, कॅन्सर विभाग, मानसोपचार विभाग अशा विविध विभागातून रुग्णांवर उपचार केले जात आहेत.
अशी माहिती हॉस्पिटलचे संचालक डॉ. ज्ञानेश्वर शिवणकर यांनी दिली .यावेळी डॉ. विजय माने, डॉ.जहीर नदाफ, श्री .प्रताप घाटगे इत्यादी संचालक उपस्थित होते. तरी गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान करण्यात आले