सांगली जिल्हा मानवाधिकार संघटनेच्या अध्यक्षपदी अन्वर इनामदार यांची निवड..
अन्वर इनामदार यांची निवड..by: अन्वर इनामदार
Tasgaon (2024-07-04) - आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना सांगली जिल्हा अध्यक्षपदी तासगांव येथील अन्वर इनामदार यांची निवड झाल्याबद्दल निवडीचे पत्र आज तासगांव येथे देताना महाराष्ट्र राज्य मानवाधिकार संघटनेचे उपाध्यक्ष प्रा. श्रीकृष्ण मोहिते सर, यांचे प्रमुख उपस्थितीत देण्यात आले याप्रसंगी सांगली जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा म्हेत्रे, सांगली जिल्हा सहसचिव दीपक पाटील, माजी जिल्हाध्यक्ष राकेश कांबळे, तासगाव तालुका अध्यक्ष विकास खाबाले, पलूस तालुका उपाध्यक्ष अमोल लाड, तासगाव तालुका समन्वयक सतीश चव्हाण, तासगाव तालुका सहसचिव सुनील लोहार, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना प्रा. श्रीकृष्ण मोहिते म्हणाले की सांगली जिल्ह्यामध्ये आतापर्यंत मानवाधिकार संघटनेचे काम चांगले सुरू आहे यापुढेही ते अधिक गतिमान करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सक्रिय असायला हवे. सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वच पदाधिकारी यांनी कार्यरत राहावे असे आवाहन त्यांनी केले.