बिहार राज्यातील एकुण १० परप्रांतीय लोकांच्या टोळीस पुण्यात अटक
त्यांचे ताब्यातुन मोबाईल फोन, रोख रक्कम असा ५,७७,१९०/- रु चा मुद्देमाल केला जप्तby: सुदाम पेंढारे
पुणे (६ सप्टेंबर २४) - दिनांक २५ ऑगस्ट रोजी फिर्यादी यांचे वडीलाचा अपघात झाल्याने ते त्याचे मुळगाव बिहार राज्य येथे जाण्यासाठी पुणे रेल्वे स्टेशन येथे तिकीट बुकींग खिडकीत चौकशी करीत असतांना, एक अनोळखी इसम फिर्यादी जवळ येवुन, त्यास ऑनलाईन तिकीट काढुन देतो माझे मामा रेल्वे खात्यामध्ये काम करतात, असे सांगुन फिर्यादी यांना डुल्या मारुती मंदिरासमोर गणेश पेठ पुणे येथे सांयकाळी ०५.१५ वा.सुमारास घेवुन आलेवर, तेथे त्याचे इतर अनोळखी साथीदाराचे मदतीने ऑनलाईन तिकीट बुक करुन देतो असे भासवुन, फिर्यादी यांचा मोबाईल फोन, बॅकेचे ए. टी. एम. कार्ड, आधार कार्ड तसेच पॅनकार्डची मागणी करुन, फिर्यादी यांना हाताने मारहाण करुन, बँक खात्याचा पासवर्ड जबरदस्तीने मागणी करुन, मोबाईल फोन, बॅकेचे ए.टी.एम. कार्ड, आधार कार्ड, पॅनकार्ड तसेच रोख रक्कम असे घेवुन पळुन गेले होते. त्यानंतर आरोपीनी त्यांचे इतर साथीदारांचे मदतीने दिनांक २५/०८/२०२४ रोजी व दि. २६/०८/२०२४ रोजी फिर्यादी यांचे ए. टी. एम. कार्डचा गैरवापर करुन, वेळो-वेळी फिर्यादीचे खात्यातुन एकुण ३,०३,८००/- रु. काढुन घेतले म्हणुन फिर्यादी यांनी फरासखाना पो.स्टे. गु.र. नं. १७१ /२०२४ भारतीय न्याय संहिता कलम ३०९ ( ४ ), ३१० ( २ ), ११५ (२), ३५२,३५१(२) (३). ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
दाखल गुन्हयाचे गांर्भीय लक्षात घेता फरासखाना पोलीस स्टेशन येथील प्रभारी श्री. प्रशांत भस्मे सर यांनी तपास पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अमंलदार यांना सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी महत्वाच्या सुचना व मार्गदर्शन केल्यानंतर, तपास पथकातील पोलीस अमलदार यांनी घटनास्थळाचे सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासुन, त्यांचे गुप्त बातमीदारा मार्फत तपास केला असता, तपास पथकातील पोलीस अमंलदार गजानन सोनुने व महेश राठोड यांना त्यांचे बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, अशा प्रकारे गुन्हे करणारे परप्रांतीय संशयीत इसम हे पुन्हा गुन्हा करण्याचे हेतुने डुल्या मारुती चौकात उभे असल्याचे खात्रीशीर बातमीवरुन, तपास पथकातील पोलीस उप-निरीक्षक, श्री अरविंद शिंदे तसेच तपास पथकातील स्टाफ असे घटनास्थळी जावुन, दोन संशयीत इसम नामे १) राजा युनुष पिंकु, वय १९ वर्षे, रा. राज्य बिहार, २) मोहम्मद सुलतान मोहम्मद तौहिद शेख, वय १८ वर्षे, राज्य बिहार यांना ताब्यात घेवुन, त्यांनी गुन्हा केल्याचे कबुल केले असता, त्यांना गुन्हयात अटक करुन,इतर ८ साथीदार इसमांना अटक केले ३) मुन्ना जोधन साह, वय ४१ वर्षे, रा. ( मुख्य सुत्रधार) ४) राकेश कपलेश्वर पासवान, वय ३२ वर्षे, ५) विशम्बर मोसफिर दास वय २५ वर्षे, ६) धर्मेन्द्रकुमार असरफिया साह वय २८ वर्षे, ७) जितेन्द्रकुमार मोहन सहनी वय २६ वर्षे, ८) राजेद्रकुमार सुखदेव महतो, वय २८ वर्षे, ९) दिनेश हरी पासवान वय २७ वर्षे, १०) पिताम्बर मोसाफिर दास वय २९ वर्षे, सर्व मुळ रा. बिहार राज्य यांना ताब्यात घेवुन त्यांचे घरझडती दरम्यान त्यांचे बॅगमधुन वेग-वेगळ्या कंपनीचे ४१ नग मोबाईल फोन, रोख १,४३,०२०/- रुपये, फिर्यादी व इतर सांक्षीदार यांचे वेग- वेगळया कंपनीचे ४ नग पाकीट त्यामध्ये ३ नग वेग-वेगळ्या इसमांचे आधार कार्ड, २ नग पॅनकार्ड, ९ नग वेग-वेगळ्या कंपनीचे ए.टी.एम. कार्ड असा सर्व मिळुन ५,७७, १९०/- रु किमंतीचा मुद्देमाल हस्तगत करुन, दाखल गुन्हा अवघ्या २४ तासात उघड करण्यात आला.
आरोपी यांची गुन्हा करण्याची पध्दत :- सर्व आरोपी हे मुळ बिहार राज्य येथील रहिवासी असुन, ते दहिहंडी व गणेश उत्सव दरम्यान पुणे येथे येतात, आणि रेल्वे स्टेशन येथे थांबुन, परगावी जाणा-या लोकांना ऑनलाईन तिकीट काढुन देण्याचा बहाना करुन, त्यांना निर्जन स्थळी घेवुन जावुन, इतर साथीदाराचे मदतीने जबदरस्तीने मारहाण करुन, ए.टी.एम, पॅनकार्ड, आधार कार्ड हिसकावुन घेवुन जाणे व नंतर वेग-वेगळ्या माध्यमातुन कार्ड स्वॅप करुन त्याव्दारे पैसे काढुन घेणे. तसेच पोलीसांना काहीएक सुगावा लागु नये त्यासाठी अंगावरील कपडे तसेच आधार कार्ड, ए.टी.एम. कार्ड फेकुन पुरावा नष्ट करणे.
सदरची कामगिरी मा.अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग श्री. प्रविणकुमार पाटील, मा.पोलीस उप आयुक्त संदिपसिंह गिल, मा. सहा.पो.आयुक्त फरासखाना विभाग श्रीमती नुतन पवार,यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. प्रशांत भस्मे, पो.नि.(गुन्हे) श्री. अजित जाधव, स.पो.नि.वैभव गायकवाड, पो.उप निरी अरविंद शिंदे, सहा.पो.फौ. मेहबुब मोकाशी, पोलीस अमंलदार तानाजी नागंरे, नितीन तेलंगे, प्रविण पासलकर, वैभव स्वामी, विशाल शिंदे, महेश राठोड, गजानन सोनुने,नितीन जाधव, संदिप कांबळे, समिर माळवदकर, सुमित खुट्टे, अर्जुन कुडाळकर, महेश पवार, शशिकांत ननावरे,चेतन होळकर यांनी केलेली आहे.