चोपडा येथे देवीच्या दर्शनाला जाणाऱ्या नाशिक येथिल भाविकांचा दोन सख्ख्या भावांसह चौघांचा मृत्यू
नवरात्रोत्सव असल्याने देवीच्या दर्शनाला भाविक जात होते.by: प्रतिनिधि
चोपडा (जळगाव) (८ ऑक्टोबर २०२४) - मनुदेवीचे दर्शन व भंडारा देण्यासाठी भाविकांवर काळाने घाला घातला. यावल- चोपडा रस्त्यावर कारचे टायर फुटल्याने झालेल्या अपघातात नाशिक येथील चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. तर कारचालक सोनू याचं रुग्णालयात उपचारदारम्यान निधन झालं.
धुळ्याच्या साक्री तालुक्यातील निजामपूर मूळ रहिवासी वाणी कुटुंब हे यावल तालुक्यातील सातपुडा निवासिनी मनुदेवी याठिकाणी नवरात्रीमध्ये दरवर्षी भंडारा देत होते. त्यानुसार नवरात्री सुरु असल्याने मंगळवारी (८ ओक्टोम्बर) राणे कुटुंबातील शैलेश श्रीधर राणे (वय ३४), निलेश श्रीधर राणे (३०) हे दोन भाऊ आणि त्यांच्या सोबत जितेंद्र मुरलीधर भोकरे (वय ४७) कार ड्रायवर सोनू हे कारने मनुदेवी येथे भंडारा देण्यासाठी सकाळी निघाले होते. मात्र मनुदेवी मंदिर काही किलोमीटर अंतरावर असतानाच समोरून येणाऱ्या बसवर आदळून त्यांच्या कारचा अपघात झाला..
चोपडा- यावल मार्गावरील मजरेहोळ फाट्याजवळ कारचा अपघात झाला. खराब रस्ता असल्याने कारचे टायर फुटले. यामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार समोरून येणाऱ्या बसवर आदळली. यात मागे बसलेले शैलेश राणे, निलेश राणे व जितेंद्र भोकरे या तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर कार चालक सोनू गंभीर जखमी झाला असता रुग्णालयात त्याच्यावर उपचार चालू असतांना निधन झालं.
यातील शैलेश राणे यांचे नाशिक(उपनगर) यांचे श्रीरत्न मेडिकल स्टोअर आहे.