अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या इसमास मुंबईत अटक

अंमलीपदार्थ विरोधी कायद्यान्वये अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या इसमास मुंबईत अटक
by: आफताब अहमद


loading


मुंबई (2024-10-22) - मुंबई शहरात मा. पोलीस आयुकत श्री. विवेक फणसळकर, मा. विशेष पोलीस आयुकत श्री. देवेन भारती यांचे निर्देशानुसार, मा. पोलीस सह आयुक्‍त (का. व सु.) श्री. सत्य नारायण यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलीपदार्थ विरोधी कायद्यान्वये विशेष मोहिम राबवून काखाई करण्यात येत असते.

तद्नुसार आर.सी.एफ पोलीस ठाणे अभिलेखावरील अंमलीपदार्थाची तस्करी करणारा इसम नामे मोहम्मद इकलाख बशीर शेख उर्फ मोहम्मद इकलाख मोहम्मद ईस्माईल शेख उर्फ मुसा उर्फ सलमान उर्फ अकलाख, वय ३२ वर्षे याच्याविरूध्द मुंबई शहरात अंमलीपदार्थ तस्करीचे एकूण 0७ गुन्हे दाखल होते.

आर.सी.एफ. पोलीस ठाणेकडून नमूद इसमास स्थानबध्द करण्याकरीता मा. शासनास प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानुसार दि. १५/१०/२०२४ रोजी मा. स्थानबध्द अधिकारी तथा प्रधान सचिव (अपील व सुरक्षा), गूह विभाग, महाराष्ट शासन, मंत्रालय, मुंबई यांनी नमूद इसमाविरूध्द 7111॥1)75 ०1 1988 अन्वये स्थानबध्द करण्याचे आदेश पारित केल्याने नमूद स्थानबध्द इसमास दि. १६/१०/२०२४ रोजी स्थानबध्द आदेशाची बजावणी करून त्यास दि. १७/१०/२०२४ रोजी सुरक्षितरित्या मध्यवती कारागूह, छत्रपती संभाजीनगर येथे जमा करण्यात आले आहे. १11५075 01 1988 अन्वये स्थानबध्द करण्याची कारवाई ही मुंबई पोलीस आयुक्‍तालयातील पहिलीच कारवाई आहे.

सदरची कामगिरी तत्कालीन अपर पोलीस आयुकत (पुर्व प्रादेशिक विभाग) श्री. विनायक देशमुख, अपर पोलीस आयकत (पुर्व प्रादेशिक विभाग) श्री. महेश पाटील, तत्कालीन पोलीस उप आयुक्‍त (परिमंडळ -६) श्री. हेमराजसिंह राजपूत, पोलीस उप आयुक्‍त (परिमंडळ-६) श्री. नवनाथ ढवळे, तत्कालीन सहाय्यक पोलीस आयुकत (ट्रॉम्बे विभाग) सुहास हेमाडे, तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक (आर.सी.एफ. पोलीस ठाणे) केदारी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आर.सी.एफ. पोलीस ठाणेचे तडीपार अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक रविंद्र पाटील व त्यांच्या पथकाने पार पाडली आहे.

बृहन्मुंबई शहरातील जनतेला आवाहन करण्यात येते की, अंमलीपदार्थ विक्री, सेवन किंवा वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याबाबत कार्यवाहीकरीता संबंधित पोलीस ठाणे तसेच बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या अंमलीपदार्थ विरोधी पथकाच्या ९८१९१११२२२ या हेल्पलाईन क्रमांकावर आणि मुख्य नियंत्रण कक्षातील १०० व ११२ तसेच 0२२-२२६४१७५२ या हेल्पलाईन क्रमांकावर माहिती दयावी.