अन्वर इनामदार यांच्या वाढदिवसानिमित्त पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या आरोग्य तपासणीचे शिबिर संपन्न.

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना सांगली, केंद्रीय संघ व ग्रामीण रुग्णालय तासगाव यांच्या संयुक्त विद्यमाने..
by: राकेश कांबळे


loading


तासगाव (2024-07-06) - तासगाव06/07/2024 रोजी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना जिल्हा सांगली,केंद्रीय पत्रकार संघ व ग्रामीण रुग्णालय तासगाव यांचे संयुक्त विद्यमाने व आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघटना जिल्हा सांगली चे अध्यक्ष श्री अन्वर इनामदार यांच्या वाढदिवसाचे अवचित्य साधून पोलीस अधिकारी, कर्मचारी व होमगार्ड यांचे रक्त तपासणी व सांगली येथील सुप्रसिद्ध स्वाद डायनेस्टिक सेंटर चे डॉ. कपिल पाटील यांचे प्रतिनिधी यांनी सर्वांची ब्लड शुगर ( रक्त साखर ) तपासणी शिबिर तासगाव पोलीस ठाणे येथील सभागृहात आयोजित केले होते. या कार्यक्रमाचे ( शिबिराचे ) उद्घाटन प्रसंगी आंतरराष्ट्रीय मानवअधिकार संघटनेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते व त्यांनी चूक व्यवस्था राखली होती. उद्घाटन समारंभात बोलताना मानव अधिकार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा म्हेत्रे यांनी पोलीस पोलीस अधिकाऱ्यांनी हा कार्यक्रम करण्यास संमती दिली याबद्दल आंतरराष्ट्रीय मान अधिकार संघटनेच्या वतीने आभार मानले. तर तासगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री सोमनाथ वाघ यांनी या आयोजनाचे कौतुक केले. पोलीस समाजात रात्र दिवस राबणारा घटक आहे. त्याला त्याचे कामाचा सन्मान मिळत नाही. परंतु आज आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघटनेने आयोजित केलेले हे शिबिर पोलिसांचे मनोबल वाढवणारे आहे. आम्हा पोलिसांची इच्छा असून देखील आमची आरोग्य तपासणी आम्ही वेळेवर करू शकत नाही परंतु आज आंतरराष्ट्रीय मानवअधिकार संघटनेने नेमका याच बाबतीत शिबिर घेऊन आम्हा पोलिसांच्या तपासण्या केल्या आहेत. याबद्दल आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे आभार मानले आहेत. संघटनेचे जिल्हा अध्यक्ष श्री अन्वर इनामदार यांना सर्वांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रस्ताविक तालुका शहर अध्यक्ष भानुदास पाटील यांनी केली. या कार्यक्रमात बोलताना आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. विद्यासागर कांबळे म्हणाले की अस्थिरोग तपासणी शिबिर सुद्धा लवकरच आयोजित करत असल्याचे सांगितले. या कार्यक्रमा वेळी ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे पुणे विभागीय सह संघटक श्री आलमशहा मोमीन तसेच सांगली जिल्हा परिषद सदस्य श्री संजय (दादा) पाटील व तुरची गावचे सरपंच श्री विकास डावरे यांची विशेष उपस्थिती होती. आजच्या रक्त तपासणी शिबिरामध्ये सिबिसी, एचबी इलेक्ट्रोफोरेसिस,ब्लड शुगर, लिपीड प्रोफाईल, HBA1C,रिनल फंक्शन, कॅन्सर मार्कर इत्यादी गंभीर आजारा विषयी तपासण्या करण्यात आल्या. महालॅबं व्यवस्थापक श्री. सयाजीराव झांबरे सर ,ग्रामीण रूग्णांलय तासगांव च्या सौ. संगीता पाटील मॅडम, तेजश्री भोसले, ॠतुजा पाटील, प्रयोगशाळा वैधानिक अधिकारी श्री. सचिन देसाई सर ,श्री.चंद्रशेखर निकम सर व इतर कर्मचारी उपस्थित होते. आजच्या कार्यक्रमासाठी आंतरराष्ट्रीय मानवअधिकार संघटनेचे जिल्हा सहसचिव दीपक पाटील, जिल्हा समन्वयक डॉ.संजय देवकुळे, तासगाव तालुका अध्यक्ष विकास खबाले, पलूस तालुका अध्यक्ष दत्तात्रय माने तासगाव तालुका सहसचिव राजेसाहेब इनामदार, केंद्रीय पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र लोंढे, जिल्हा उपाध्यक्ष राकेश कांबळे, पलूस तालुका सचिव धनंजय गायकवाड,सतीश चव्हाण, सुनील लोहार, श्रीधर माने, सतीश कांबळे, पैगंबर मुजावर आदी मान्यवर उपस्थित होते