तासगावात ९ लाखांचा गांजा जप्त; एकाला अटक
नशामुक्त समाज निर्माण करण्याच्या दृष्टीने पोलिसांची ही कारवाई महत्त्वपूर्ण मानली जात आहे.by: अनवर इनामदार : ब्युरो चिफ, क्राईम डायरी
तासगाव, सांगली (२ नोवेंबर २०२५) - अमली पदार्थ विरोधी अभियानांतर्गत तासगाव पोलिसांनी मोठी कारवाई करत सुमारे ९ लाख ८ हजार ५०० रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला अटक केली असून, त्याच्याकडून गांजा आणि गांजा वाहतुकीसाठी वापरलेली मोटारसायकल (क्रमांक MH 10 DB 5206) असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक अशोक भवड यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे,
सहाय्यक पोलीस निरीक्षक बिरुदेव काबुगडे,
अभिजीत गायकवाड, अमित परीट, अमर सूर्यवंशी, प्रशांत चव्हाण, विठ्ठल सानप आणि विवेक यादव यांच्या पथकाने केली.
गुन्हे प्रकटीकरण शाखेतील प्रशांत चव्हाण, विठ्ठल सानप आणि विवेक यादव यांनी विशेष पुढाकार घेत या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली.
तासगाव पोलिसांची ही आणखी एक यशस्वी धडक कारवाई ठरली आहे.
सखोल तपास सुरू
अटक केलेल्या संशयिताची पोलीस सखोल चौकशी करत आहेत. हा गांजा कोठून आणण्यात आला आणि तो कोणाला विक्रीसाठी घेऊन जात होता, या दिशेने तपास वेगाने सुरू आहे.
नशामुक्त समाज निर्माण करण्याच्या दृष्टीने पोलिसांची ही कारवाई महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
Report by- Anwar Inamdar, Buerao Chief- Crime Diary