कुपवाड दुहेरी हत्याकांडाचा तासगाव शहर मुस्लिम समाजाकडून जाहीर निषेध

...
by: अन्वर इनामदार


loading


सांगली (२० ऑगस्ट २०२६) - माणुसकीला काळिमा फासणाऱ्या आणि माणुसकी, धर्म व संवेदनशीलतेला गालबोट लावणाऱ्या कुपवाड येथील दुहेरी हत्याकांडाचा तासगाव शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीने तीव्र शब्दांत जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.

केसरेकर यांच्या दुहेरी हत्याकांडातील आरोपी फरीद शेख याच्यावर कायद्यानुसार कठोरात कठोर कारवाई करून, दोष सिद्ध झाल्यास फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली.

अशा प्रकारच्या हिंसक व चुकीच्या प्रवृत्तींना तासगाव शहरातील मुस्लिम समाज कधीही थारा देत नाही आणि अशा कृत्यांना कोणत्याही प्रकारचे समर्थनही करत नाही. समाजात शांतता, सलोखा, बंधुभाव आणि कायद्याचा सन्मान कायम राहावा, हीच मुस्लिम समाजाची भूमिका आहे.

दरम्यान, परवा आयोजित करण्यात आलेल्या तासगाव बंदला तासगाव शहर मुस्लिम समाजाच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला.

यासंदर्भात मुस्लिम समाजातील नागरिकांच्या स्वाक्षऱ्यांचे निवेदन तासगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मा. विशाल टकले यांना देण्यात आले.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते निसार मुल्ला, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटनेचे सांगली जिल्हा अध्यक्ष अनवर (भाई) इनामदार, तसेच जमीर मुजावर, अशपाक मुल्ला, अल्ताफ मेहत्तर, शमशुद्दीन मुल्ला आणि शकील सय्यद आदी मान्यवर व मुस्लिम समाजातील नागरिक उपस्थित होते.