बाळासाहेब भवन येथे कुलदीप देवकुळे यांची पश्चिम महाराष्ट्र सचिवपदी नियुक्ती

‘शिवसेना म्हणजे महाराष्ट्राचा स्वाभिमान’ — कुलदीप देवकुळे
by: अन्वर इनामदार


loading


तासगाव (2026-10-02) - उद्योग-व्यवसायाच्या माध्यमातून गावागावांत उद्योजक घडविण्याचा प्रयत्न — रामेश्वर वाडेकर मुंबई : शिवसेना मुख्य कार्यालय, बाळासाहेब भवन, मुंबई येथे शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार आणि शिवसेना सचिव संजयजी मोरे यांच्या सूचनेनुसार शिव उद्योग सहकार सेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक प्रदेशाध्यक्ष रामेश्वर पाटील वाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. बैठकीत संघटनात्मक विस्तार, उद्योग-व्यवसायाच्या माध्यमातून युवकांना उपलब्ध होणाऱ्या संधी, रोजगारनिर्मिती तसेच सहकाराच्या माध्यमातून स्वावलंबनाला चालना देण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीत विजयकुमार पवार (पुणे) यांची कार्याध्यक्षपदी, तर कुलदीप देवकुळे यांची पश्चिम महाराष्ट्र सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष रामेश्वर पाटील वाडेकर यांच्या हस्ते कुलदीप देवकुळे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. महाराष्ट्रातील प्रत्येक गाव-खेड्यात उद्योजक निर्माण करण्याच्या उद्देशाने शिव उद्योग सहकार सेनेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष रामेश्वर पाटील वाडेकर यांनी सांगितले. उद्योग, व्यवसाय आणि सहकाराच्या माध्यमातून तरुणांना संधी उपलब्ध करून देतानाच संघटनेचे कार्य महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्यासाठी संघटनात्मक पातळीवर व्यापक काम केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. नियुक्तीनंतर बोलताना कुलदीप देवकुळे म्हणाले, “शिवसेना म्हणजे महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे. उद्योग, व्यवसाय, रोजगार आणि स्वावलंबनाच्या माध्यमातून युवक, महिला, छोटे उद्योजक आणि व्यावसायिकांना बळ देत शिव उद्योग सहकार सेनेचे कार्य पश्चिम महाराष्ट्रात अधिक व्यापक करण्याचा माझा प्रयत्न राहील. गावागावांत उद्योजक निर्माण व्हावेत आणि तरुणांच्या हाताला रोजगार मिळावा, यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रभावीपणे काम करू.” यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व मार्गदर्शक प्रशांत पालांडे उपस्थित होते. त्यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून आगामी संघटनात्मक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष राजू चव्हाण, माजी नगरसेवक दिलीप नाईक, पश्चिम महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य विशाल आचार्य, शिव उद्योग सहकार सेनेचे सांगली जिल्हाध्यक्ष संग्राम भोसले, जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र पाटील, जिल्हा सचिव दिलावर शिकलगार यांच्यासह कोकण, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र विभागातील शिवसेना व शिव उद्योग सहकार सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पश्चिम महाराष्ट्रात शिव उद्योग सहकार सेनेचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांचे व्यापक जाळे निर्माण करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. युवक, महिला, छोटे उद्योजक आणि व्यावसायिकांना संघटनेशी जोडून उद्योग, सहकार, रोजगार आणि स्वावलंबनाला चालना देण्यासाठी आगामी काळात विविध उपक्रम राबविण्याचे नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी सांगितले.