कै. विठ्ठल ज्ञानू पाटील यांचे दुःखद निधन

तुरची गावातील जिद्दी, कष्टाळू व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड
by: अन्वर इनामदार


loading


तासगाव (2026-07-01) - तुरची गावातील ज्येष्ठ नागरिक, कष्टाळू शेतकरी व माजी दुकानदार कै. विठ्ठल ज्ञानू पाटील यांचे बुधवार, दि. १ जुलै २०२६ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने तुरची गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, सर्व स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे. कै. विठ्ठल पाटील यांनी आपल्या आयुष्याची सुरुवात दुकानदार म्हणून केली. त्यानंतर शेती व्यवसाय स्वीकारून प्रामाणिकपणे आणि कष्टाने आपले जीवन घडविले. अपघातात एका पायाला अपंगत्व आले, तरीही त्यांनी संकटांसमोर कधीही हार मानली नाही. जिद्द, आत्मविश्वास आणि परिश्रमाच्या जोरावर त्यांनी आयुष्याचा प्रत्येक टप्पा धैर्याने पार केला. प्रतिकूल परिस्थितीतही खंबीरपणे जगण्याचा आदर्श त्यांनी समाजासमोर ठेवला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा सचिन पाटील, मुलगी सुस्मिता, तसेच नातवंडे, नातेवाईक व आप्तेष्ट असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवार, दि. ३ जुलै २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता तुरची स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो व त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, हीच भावपूर्ण श्रद्धांजली.