भारतीय सैन्यातील माजी सुभेदार नबीलाल मुल्ला यांचे निधन
तुरची (ता. तासगाव, जि. सांगलीby: अन्वर इनामदार
तासगाव, ता. तासगाव, जि. सांगली (२७ डिसेंबर २०२५) - तुरची येथील रहिवासी मरहूम श्री. नबीलाल बाबालाल मुल्ला यांचे दि. 26 डिसेंबर 2025 रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. ते भारतीय सैन्यात सुभेदार पदावर कार्यरत होते व त्यांनी २४ वर्षे देशसेवा बजावली.
त्यांच्या निधनाने कुटुंबीयांसह संपूर्ण तुरची गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे.
त्यांची जियारात (रक्षा विसर्जन) दि. 28 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 9.30 वाजता होणार आहे.
देशसेवेसाठी आयुष्य समर्पित केलेल्या या माजी सुभेदाराच्या निधनाबद्दल माजी सैनिक, सामाजिक कार्यकर्ते तसेच ग्रामस्थांकडून शोकसंवेदना व्यक्त करण्यात येत आहेत. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो, हीच सर्वांची प्रार्थना.