समाजामध्ये वाचणाची आवड निर्माण करणे गरजेचे

ग्रामीण कथाकार श्री शांताराम लोखंडे
by: अन्वर इनामदार


loading


तासगांव (2024-06-13) - समाजामध्ये वाचणाची आवड निर्माण करणे गरजेचे सध्याच्या युगात मोबाईल व टीव्ही मुळे वाचनाची आवड फारच कमी होत चालली आहे. गावागावात, शासकीय आनुदानावर वाचनालये चालू आहेत परंतु त्याचा फायदा फारच कमी लोक घेतात. तरुन पीडीने वाचणाची सवई लावून घेणे गरजेचे असून,वाचन संस्कृतीचा जागर होणे आवश्यक आहे असे प्रतिपादन ग्रामीण कथाकार शांताराम लोखंडे (तुरची )यांनी व्यक्त केले . आंतरराष्ट्रीय मानवधीकार संघटना सांगली व केंद्रीय पत्रकार संघाच्या वतीने श्री शांताराम लोखंडे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी आंतरराष्ट्रीय मानवधीकार संघटनेचे अध्यक्ष अनवर इनामदार व जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा म्हेत्रे, केंद्रीय पत्रकार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष राकेश कांबळे व तासगाव तालुका अध्यक्ष, विशाल टेके,तसेच ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य पुणे विभागीय संघटक आलमशहा मोमीन आदी मान्यवर उपस्थीत होते!