शिक्रापुर पोलीस ठाण्याच्या खुनाच्या गुन्हयामध्ये २ वर्षापासुन पोलीसांना गुंगारा देणारा पाहिजे आरोपीस केले जेरबंद

पुणे शहर युनिट ०५ गुन्हे शाखेची कामगिरी
by: सुदाम पेंढारे


loading


पुणे (३० ऑगस्ट) - पुणे ग्रामीण पोलीस कडील शिक्रापुर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर १०७८/२०२२ भादवि कलम. ३०२,१४१,१४३,१४७,१४८,१४९,३४१,३२४ या गुन्हयात आरोपी नामे.धन्या ऊर्फ धनराज शांतीलाल शेरावत हा गुन्हा केल्यानंतर सुमारे ०२ वर्षापासुन स्थानिक पोलीसांना गुंगारा देवुन लपुन बसत होता.

दि.२८/०८/२०२४ रोजी पाहिजे आरोपी धनराज शांतीलाल शेरावत, वय. २३ वर्षे, रा.म्हमोबा नगर म्हशीच्या गोटया जवळ, वेस्टन फोरजी कंपनी, सणसवाडी तळेगाव रोड, ता.शिरुर जि.पुणे हा अमरधाम स्मशानभुमीजवळ माळवाडी हडपसर पुणे या ठिकाणी आला असल्याची माहिती मिळाल्याने युनिट ०५ कडील पोलीस पथकाने त्यास सापळा रचुन जेरबंद केले.

आरोपी धन्या ऊर्फ धनराज शांतीलाल शेरावत यास ताब्यात घेवुन त्याची ओळख पटवुन त्याने व त्याचे साथिदारांनी मिळुन सणसवाडी परिसरामध्ये खुन केला असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास पुढील कार्यवाही करीता शिक्रापुर पोलीस स्टेशन,पुणे ग्रामिण यांचे ताब्यात देण्यात आलेले आहे.