पुणे येथे मोबाईल कंपनींचे टॉवर वरिल महागड्या रिमोट रेडीओ युनीटची चोरी

चोरी करणारा जेरबंद, एकुण ५,७०,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त
by: प्रतिनिधि


loading


पुणे (२९ ऑगस्ट) - दि.८ मार्च २४ रोजी फिर्यादी सागर राजेंद्र मोरे हे नोकरीस असलेल्या एका कंपनीने केदार अपार्टमेंट,संभाजीनगर, धनकवडी पुणे व साई कृपा सोसायटी सहकारनगर पुणे येथे मोबाईल टॉवर बसवले होते. सदर टॉवरवर एका कंपनीने ४ जी नेटवर्कसाठी रिमोट रेडीओ युनीट असे एकुण ९ नग मशीन बसविल्या होत्या. त्याची अज्ञात इसमाने चोरी केले त्याबाबत सहकारनगर पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं.७३/२०२४,भा.द.वि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदर गुन्हया मध्ये यापुर्वी १) अक्षय शांताराम बोडके वय २६ वर्षे रा. इंदिरानगर बिबवेवाडी पुणे २) अशिष अशोक शिंदे वय ३९ वर्षे रा. पापळ वस्ती बिबवेवाडी पुणे असे आरोपी अटक करण्यात आले होते.

मंगळवार, २७ ऑगस्ट रोजी सहकारनगर पोलीस स्टेशन तपास पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार असे सहकारनगर पोलीस स्टेशनचे हद्दीत दहिहंडी सणा निमीत्त पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार सागर सुतकर यांना बातमी मिळाली की, मोबाईल टॉवरवरील किंमती मशीन चोरी करणारा एक इसम के.के.मार्केटचे पुढे भंगाराचे दुकानाजवळ चोरीच्या रिमोट रेडीओ मशीन पोत्यात घेवुन विक्री करण्यासाठी येणार आहे अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने सदरची बातमी सहकारनगर पोलीस स्टेशन कडिल वरिष्ठ पालीस निरीक्षक श्री. छगन कापसे यांना कळविली असता त्यांनी लागलीच सपोनि. सागर पाटील व अंमलदार यांची टीम तयार करुन त्यांना सुचना व मार्गदर्शन करून बातमीचे ठिकाणी जावुन कारवाई करण्याचे आदेश दिले त्यानुसार सहकारनगर पोलीस स्टेशन तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी बातमीचे ठिकाणी जावुन छापा टाकुन आरोपीस त्याचेकडील पोत्यातील मालासह ताब्यात घेवुन नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव दिलशाद मोहमद रफिक वय ३२ वर्षे रा. कुलउत्सव सोसायटी, खडी मशिन चौक कोंढवा पुणे मुळ उत्तर प्रदेश असे सांगितले असुन त्याच्याकडे दाखल गुन्हयाच्या अनुशंगाने विश्वासात घेवुन चौकशी करता त्याने सदरचा गुन्हा हा त्याचे साथीदार अक्षय बोडके, अशिष शिंदे दोघे रा. बिबवेवाडी पुणे यांच्यासह केल्याचे कबुल केल्याने त्याचे ताब्यातुन सदर गुन्हयातील व इतर गुन्हयातील असा एकुण ५,७०,०००/- रु किंमतीचे मुद्देमालासह सदर गुन्हयात आरोपीस अटक करण्यात आली आहे.

सदरची कामगीरी मा. अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग श्री. प्रविणकुमार पाटील, मा. पोलीस उपायुक्त परिमंडळ २, श्रीमती स्मार्तना पाटील, मा. सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग श्रीमती नंदिनी वग्यानी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सहकारनगर पोलीस स्टेशन श्री. छगन कापसे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. उत्तम भजनावळे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहा पोलीस निरीक्षक सागर पाटील,सहा.पो.उप.निरी बापु खुटवड, पोलीस अंमलदार सागर सुतकर, खंडु शिंदे, अमोल पवार, किरण कांबळे,बजरंग पवार,चंद्रकांत जाधव, महेश मंडलिक, सागर कुंभार, अमित पदमाळे, विशाल वाघ यांनी केली आहे.