...असे ही अनोखे रक्षाबंधन
ग्राहक पंचायत महाराष्ट्र व आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना सांगली यांच्यामार्फत अनोखा उपक्रमby: अन्वर इनामदार
कडेगाव (२२ ऑगस्ट २४) - रक्षाबंधन हे भावाबहिणीच्या नात्याचा पवित्र असा भारतीय सण आहे. पण जनसामान्यांची सेवा व कर्तव्यपुर्ती करणाऱ्या प्रशासनातील अधिकारी यांच्याशीही अतूट नाते असून सुसंवाद नागरिकाकडून होत असतो. प्रशासनातील अधिकारी आपली कर्तव्यपुर्ती करत समाजाची सेवा करत आहेत.
राष्ट्संत तुकडोजी महाराज ग्रामगीतेतील अध्याय तेविसाव्यातील ९८व्या ओवीत म्हटले आहे की "सामुदायिकता वाढे सर्वत्र। हेचि सणवाराचे मूळ सूत्र। सामुदायिकताचा प्रकार। तोचि खरा उत्सव। या युक्ती प्रमाणे ग्राहक पंचायत महाराष्ट्र, सांगली, मानवधिकार संघटना सांगली,केंद्रीय पत्रकार संघटना सांगलीच्या वतीने कडेगाव तालुक्यातील प्रशासनातील अधिकारी यांना राखी बांधून अनोखे असे रक्षाबंधन साजरे केले.
याप्रसंगी प्रांताधिकारी रणजित भोसले, नायब तहसीलदार गुरव, कडेगाव पोलीस स्टेशनचे संग्राम शेवाळे यांना राखी बांधून समाजाचे रक्षण करीत समाजाची कर्तव्यपुर्ती करावीचा संदेश देतच रक्षाबंधन पार पडले याप्रसंगी ग्राहक पंचायत महाराष्ट्र पुणे विभागीय संघटक आलमशहा मोमीन, आंतरराष्ट्रीय मानवधिकार संघटना सांगली जिल्हाध्यक्ष अन्वर इनामदार, जिल्हाउपाध्यक्ष कृष्णा म्हेत्रे केंद्रिय पत्रकार संघटना पलूस तालुकाध्यक्ष दतात्रय माने कडेगाव तालुकाध्यक्ष सदानंद माळी व मान्यवर उपस्थित होते.