एकनिष्ठता काँग्रेस पक्षाशी, सोनसळच्या कदम घराण्याची

काँग्रेसची एकनिष्ठ वंशपरंपरा...
by: अन्वर इनामदार


loading


कडेगाव (०४ सप्टेंबर) - काँग्रेसची एकनिष्ठ वंशपरंपरा असलेली अनेक घराणे आहेत.महाराष्ट्राच्या राजकारणात सुमारे ५०० पेक्षा जास्त घराणी आहेत असे अनेक मतदार संघ आज महाराष्टात आहेत पुर्वीचा भिलवडी वांगी तर आताचा पलूस कडेगाव विधानसभा मतदार संघात कदम घराण्याचाच बालेकिल्ला आहेच, याच सांगलीतील पलूस कडेगाव विधानसभा मतदार संघातही डाँ पतंगराव कदम घराण्याचा काँग्रेसशी एकनिष्ठ असणारे असून १३७ वर्षीही काँग्रेसनिष्ठ असेच आहे.

डॉ. स्वर्गीय पतंगराव कदम हे कुणापुढेही झुकण नव्हते. डाँ पतंगराव कदम यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरवात अपक्ष म्हणून काँग्रेसच्या विरोधात झाली होती मात्र त्यानंतर ते काँग्रेसवासीच झाले काँग्रेस पक्षात स्वतःचा दबदबा असणारे वजनदार नेते होते. राजकीय जीवनात त्यांनी काँग्रेसची विचारधारा अंगिकारली. यामुळे त्यांना मंत्रीमंडळात काम करण्याची संधी मिळाली. काँग्रेसच्या मंत्रीमंडळात त्यांना दुय्यम दर्जा असलेले वन खाते दिले पण साहेबांनी वन खात्याचा कार्यभार हाती घेताच वेगळी ऊर्जा या खात्यात निर्माण केली. वेगळी दिशा दिली. त्यांची काम करण्याची पद्धत धडाकेबाज होती. मंत्री म्हणून काम मिळालेल्या संधीचे सोनेच करत समाज उपयोगी काम केले. दूरदृष्टीचे नेतृत्व कसे असावे याचे उत्तम उदाहरण म्हणजे डॉ. पतंगराव कदम. त्यांनी स्वतःचा स्वाभिमान ठेवतच राजकारणात आपले स्वतःचे एक वेगळेपण जपले. डॉ. पतंगराव कदम यांनी धाडसीपणाने येणाऱ्या संकट किंवा समस्येवर दिलखुलासपणे मार्ग काढत असत कुणापुढेही कधीच झुकले नाहीत. सर्वसामान्य कार्यकर्तेना बरोबरनेहमीच सुसंवाद करत. त्यांची विचारपूस करत त्यांच्या सुखदुःखातही सहभागी होत. त्यामुळे डॉ. पतंगराव कदम हे सर्वसामान्याचे नेते होते. पित्याची ही विचारधारा जोपासण्याचे काम डॉ. विश्वजीत कदम यांच्या खांद्यावर आहे. हे शिवधनुष्य पेलण्याची काम ते करण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र त्यांना या कामी म्हणावे असेच यश संपादन होत आहे. पतंगराव कदमानी भारती विधापीठ सारखी संस्था शून्यातून निर्माण केली तिला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवली आपले कार्यकृर्तत्वाने सिद्ध केले आहे तर काँग्रेस पक्षासह स्वःताची उंचीही वाढवली असल्याचे सर्वश्रुत आहे काँग्रेस पक्षात सुरवातीपासून आज अखेर डाँ पतंगराव कदम यांनी हयात घालवली आहे काँग्रेसच्या पडत्या काळातही वनश्री माजी आमदार मोहनराव कदमही काँग्रेसला सावरण्यासाठी आजही तरुणाईला लाजवेल असेच पक्षाचेच काम करीत आहेत आजही टक्के टोणपे खातही १३७वर्षाची काग्रेस वाटचाल करत आहे काँग्रेस सर्व संकटाचा मुकाबला करतच आजही राजकीय वातावरणात असहाय्य व हतबल बनली असली तरीही अढळपणे तग धरुन उभी आहे

काँग्रेस शिवाय पर्याय नाही काँग्रेस पक्षाची एक संहिता आहे ही संहिता पाळणे हे काँग्रेसच्या प्रत्येक नेत्याचे कर्तव्य आहे. यासाठी काँग्रेस मधील युवा पिढी पुढे सरसावली आहे युवा नेता राहुल गांधी पासून ते महाराष्ट्रातील काँग्रेस मधील घराणेशाहीतील युवापिढीने काँग्रेस पक्षवाढीसाठी व बळकटीकरण व सशक्तीकरण करत काँग्रेसला पुन्हागतवैभव प्राप्त करुन देतील राज्यातील काँग्रेस राजकारण्यासाठी दिशादर्शक ठरलेल्या डॉ. पतंगराव कदम या लोकनेत्याच्या मुलगा डॉ विश्वजीत कदम हे विश्वरुपी काँग्रेस पक्ष बळकटीकरणासाठी आज जिवाचे रान करत आहेत. डॉ. विश्वजीत कदम यांनी आपल्या कार्यप्रणालीची वेगळी चुणूक दाखवत काँग्रेस पक्षातही नवचैतन्य व युवापिढीला बरोबर घेत पक्षात स्वःताचे वेगळे स्थान निर्माण केले आहे विश्व रुपी काँग्रेसमधील युवा नेता डाँ विश्वजीत कदम १३७ वर्षाचा इतिहास असलेल्या काँग्रेसमध्येच एकनिष्ठ राहत काँग्रेस पक्षाला निश्चितच राजवैभव प्राप्त करुन देतील यांत शंकाच नाही.