ट्रॉम्बे पोलीसांनी सराईत गुन्हेगाराकडून ०१ देशी बनावटीचे अग्निशस्त्र व ०२ जीवंत काडतुसे केले हस्तगत

कलम ३, २५ शस्त्र अधिनियम सह कलम ३७ (१) (अ), १३५ मपोका अंतर्गत गुन्ह्याची नोंद
by: सुदाम पेंढारे


loading


मुंबई (१७ ऑक्टोबर २०२४ ) - ट्रॉम्बे पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण पथक पोलीस ठाणे हद्दीत गस्त करीत असताना पोलीस ठाणे अभिलेखावरील सराईत आरोपी आदित्य शाम पारखे उर्फ मिठटू, वय २५ वर्षे हा संशयित हालचाली करीत असल्याचे दिसून आल्याने पोलीस पथकाने त्याची अंगझडती घेतली असता त्याचेकडे ०१ देशी बनावटीचे अग्निशस्त्र व २ जिवंत काडतुसे मिळून आली.

त्याचेविरोधात ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात कलम ३, २५ शस्त्र अधिनियम सह कलम ३७ (१) (अ), १३५ मपोका अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.