रयतेचे कैवारी माजी खासदार संजय( काका) पाटील यांच्या सिंहगर्जनेने ‘माणदेश दर्शन’चा वर्धापन दिन गाजला!
तासगाव येथे चौथा वर्धापन दिन व पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात; विविध क्षेत्रातील कर्तृत्ववानांचा गौरवby: अन्वर इनामदार
तासगाव (२२ ऑगस्ट २०२६) - होनाई न्यूज साप्ताहिक माणदेश दर्शनचा चौथा वर्धापन दिन व पुरस्कार वितरण सोहळा तासगाव येथील हॉटेल शालिनी डीलक्स येथे उत्साहपूर्ण आणि दिमाखदार वातावरणात संपन्न झाला. रयतेचे कैवारी व माजी खासदार संजय (काका) पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमुळे या सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन तसेच तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण करून करण्यात आली. ज्येष्ठ पत्रकार शशिकांत डांगे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
यावेळी माजी खासदार संजय काका पाटील, खानापूर तालुका भाजपा अध्यक्ष व लोकनियुक्त सरपंच दाजीभाऊ पवार, नगराध्यक्षा सौ. विजयाताई पाटील, उपनगराध्यक्ष प्रसाद पैलवान, माजी नगराध्यक्ष बाबासाहेब (तात्या) पाटील, उद्योगपती सुहास कुंडले, माजी आमदार सदाशिव (भाऊ) पाटील, मिरज पंचायत समितीचे उपसभापती विक्रम (भाऊ) पाटील, तासगाव तालुका शिवसेनाप्रमुख संजय चव्हाण, वेताळगुरु देवस्थानचे व्यवस्थापक विलास (तात्या) मुळीक, माजी सहाय्यक पोलीस निरीक्षक सलीम मुलाणी आदी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
‘माणदेश दर्शन’च्या निर्भीड पत्रकारितेला संजय काकांचा पाठिंबा -
यावेळी बोलताना माजी खासदार संजय काका पाटील म्हणाले की, गुरुवर्य स्वर्गीय हरिभाऊ खुजट यांचे विचार पत्रकार अधिकराव लोखंडे यांनी जपले आहेत. होनाई न्यूज साप्ताहिक माणदेश दर्शनचे काम निर्भीड असून, त्यांच्या या वाटचालीत आपण खंबीरपणे पाठीशी उभे आहोत, असे त्यांनी सांगितले.
लोखंडे कुटुंबाशी पाटील कुटुंबाचे जुने ऋणानुबंध-
विटा नगरीचे लोकनेते स्वर्गीय हणमंतराव पाटील साहेब आणि लोखंडे कुटुंबाचे अनेक दशकांपासूनचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. माजी आमदार सदाशिव (भाऊ) पाटील व लोखंडे परिवाराचे जुने ऋणानुबंध असून, जनतेसाठी सदैव उपलब्ध राहणारे हे पाटील कुटुंब असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
माजी आमदार सदाशिव भाऊ पाटील तसेच माजी नगराध्यक्ष वैभव (दादा) पाटील हे जनतेच्या अडचणींसाठी एका फोनवर तत्परतेने धावून जाणारे नेतृत्व म्हणून परिचित आहेत.
खानापूरचे धाडसी व अभ्यासू नेतृत्व दाजीभाऊ पवार -
खानापूर तालुका भाजपा अध्यक्ष व अगस्ती नगरचे लोकनियुक्त सरपंच दाजीभाऊ पवार हे खानापूरसह घाटमाथ्यावर धाडसी व अभ्यासू नेतृत्व म्हणून ओळखले जातात. आमदार गोपीचंद पडळकर व माजी समाजकल्याण सभापती ब्रह्मानंद (शेठ) पडळकर यांचे ते निकटवर्तीय मानले जातात.
संपादक अधिकराव लोखंडे यांच्या पत्रकारितेच्या वाटचालीत दाजीभाऊ पवार यांनी वेळोवेळी मोलाची साथ व मार्गदर्शन केले असून, माणदेश दर्शनच्या वाटचालीत त्यांचा महत्त्वाचा वाटा असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
हातनूरच्या पाटील घराण्याची दानशूर परंपरा -
हातनूर येथील शिवाजी पांडुरंग पाटील अर्थात शिवाआबा आणि सांगली साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष विलास (भाऊ) पाटील हे सख्खे भाऊ असून, दोघेही माजी खासदार संजय काका पाटील यांचे निकटवर्तीय आहेत.
पाटील घराण्याची दानशूर परंपरा सांगताना, पूर्वीच्या काळात हातनूरमधील जमीन नसलेल्या अनेक गरीब कुटुंबांना स्थैर्य मिळावे यासाठी त्यांच्या पूर्वजांनी जमीन दान केल्याचा उल्लेख करण्यात आला. संपादक अधिकराव लोखंडे आणि विलास भाऊ व शिवाजी आबा यांचे सख्ख्या भावाप्रमाणे संबंध असून, तिसऱ्या पिढीपर्यंत दोन्ही कुटुंबातील स्नेह कायम असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
मोहिते-पाटील व खराडे-पाटील कुटुंबीयांकडून सन्मान -
सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील यांचे स्नेही व मोहिते-पाटील कुटुंबाचे मेहुणे प्रदीप (काका) खराडे आणि आशिष (मामा) खराडे यांनी संपादक अधिकराव लोखंडे यांचा सहकुटुंब सन्मान केला.
विविध क्षेत्रातील कर्तृत्ववानांचा गौरव -
कार्यक्रमाच्या मध्यंतरात माजी खासदार संजय काका पाटील, दाजीभाऊ पवार, तासगाव तालुका शिवसेनाप्रमुख संजय (दाजी) चव्हाण, पोलीस निरीक्षक विशाल टकले, माजी उपसभापती विक्रम (भाऊ) पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमास विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. यामध्ये आर.डी. (आप्पा) पाटील, अमोल (नाना) शिंदे, दीपक बाबा अमृतसागर, उमेश गावडे, सचिन शेटे, संदीप पाटील, सचिन पाटील, मधुकर (भाऊ) पाटील, डॉ. ज्ञानेश्वर शिवणकर, अनिल (भाऊ) पाटील, शेतकरी नेते शरद पवार, लोकनियुक्त सरपंच जयंत पाटील, जोतीराम (आप्पा) जाधव, भाई दिगंबर कांबळे, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष अनवर इनामदार, कामगार नेत्या शितलताई गायकवाड, सिंहसेना महिला राज्याध्यक्षा पुष्पाताई बोंबडे, सिंहसेना प्रमुख शिवसाहेब शिंदे, वैशालीताई डोंगरे, चंद्रकांत गायकवाड, मर्दानी खेळाडू श्रावणी चौगुले, सिनेअभिनेता व नकलाकार निवास कळसे, तानाजी जाधव, भगवान जाधव, पत्रकार गणेश धेडे, रूपेश पिसाळ, राधिका शिदे आदींचा समावेश होता.
फोनवरून मान्यवरांच्या शुभेच्छा -
कार्यक्रमास प्रत्यक्ष उपस्थित राहता न आलेल्या अनेक मान्यवरांनी दूरध्वनीवरून माणदेश दर्शनच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. यामध्ये आमदार रोहितदादा पाटील, आमदार सुहास बाबर, वैभवदादा पाटील, माजी आमदार विक्रमसिंह सावंत, ऋषिकेश लाड, बाळदादा उर्फ जयसिंह मोहिते पाटील, समीतदादा, सतीश सावंत, बजरंग पाटील, आनंदराव (बापू) पवार, महेंद्र चंडाळे आदींचा समावेश होता.
पुरस्कारार्थींनी व्यक्त केला आनंद -
पुरस्कार प्राप्त मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना होनाई न्यूज व साप्ताहिक माणदेश दर्शनने उत्कृष्ट आयोजन करून आमचा सन्मान केला. या पुरस्कारामुळे सामाजिक व विविध क्षेत्रातील कार्य अधिक जोमाने करण्यास प्रेरणा मिळेल, अशी भावना व्यक्त केली.
कार्यक्रमाचे आभार विनोद मोरे व संतराम मंडले यांनी मानले. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.