मालगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे केवळ एका समाजापुरते मर्यादित नसून ते संपूर्ण मानवजातीसाठी मार्गदर्शक आहेत - वसंत अण्णा खांडेकरby: प्रतिनिधि
मालगाव, मिरज (१४ एप्रिल २०२६) - भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती आज मालगाव येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. येथील स्थानिक बौद्ध विहारांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
या मंगलप्रसंगी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे मिरज तालुका अध्यक्ष माननीय वसंत अण्णा खांडेकर यांनी उपस्थित राहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला आणि विनम्र अभिवादन केले.
यावेळी बोलताना वसंत अण्णा खांडेकर म्हणाले की, "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे केवळ एका समाजापुरते मर्यादित नसून ते संपूर्ण मानवजातीसाठी मार्गदर्शक आहेत. त्यांचे समता, न्याय आणि बंधुत्वाचे विचार अंगीकारणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल."
या कार्यक्रमासाठी विहारातील पदाधिकारी, उपासक-उपासिका आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जयंतीनिमित्त विहाराची सजावट करण्यात आली होती असून दिवसभर विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.