छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मिरजमध्ये अभिवादन
राष्ट्रभक्तीची भावना दृढ करण्याचा संदेशby: सागर आठवले
मिरज, सांगली (१९ फेब्रुवारी २०२६) - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना, मिरज तालुका यांच्या वतीने मिरज येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी संघटनेचे मिरज तालुका अध्यक्ष मा. वसंत अण्णा खांडेकर, मिरज तालुका सचिव मा. सागर आठवले, सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्र सचिव मा. कुमार भंडारे तसेच मा. पंकज माने यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा व आदर्शांचा गौरव करत त्यांच्या विचारांचा समाजात प्रसार करण्याचा संकल्प व्यक्त केला. कार्यक्रमात उपस्थित कार्यकर्त्यांनी शिवरायांना अभिवादन करून राष्ट्रभक्तीची भावना दृढ करण्याचा संदेश दिला.