निमणी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन
या कार्यक्रमातून डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा जागर आणि सामाजिक समतेचा संदेश देण्यात आला.by: प्रतिनिधि
निमणी, ता. तासगाव (१४ एप्रिल २०२६) - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त निमणी गावात त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायत कार्यालय तसेच सामाजिक सभागृह येथे सामूहिक प्रार्थना करून डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत आदरांजली वाहण्यात आली.
कार्यक्रमास सरपंच सौ. रेखा रविंद्र पाटील, उपसरपंच राजेंद्र घोडके, माजी सरपंच विजय पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच दिपक पाटील, नामदेव जमदाडे, सौ. संगीता चौगुले, सौ. कल्पना सुखदेव, एम. आर. पाटील, सतीश पाटील, आप्पासाहेब पाटील, विलास कदम, पांडुरंग सुखदेव, दादासाहेब पाटील, पी. डी. गुरव, अनिल सुखदेव, पंडित राजमाने, अशोक सूर्यवंशी, विशाल घोडके, दादा घोडके, श्रीरंग देवकुळे, एम. जे. पाटील, गणपती पाटील, प्रज्वल काळीबाग, बाळासो काळीबाग, केतन काळीबाग, पंढरीनाथ काळीबाग, प्रफुल काळीबाग, पावलस देवकुळे, राजेंद्र सुखदेव, युवराज सुखदेव, अमित सुखदेव, गजानन वासुदेव, ओंकार पवार, गणेश पवार, नितीन पवार, रोहित पवार, नवनाथ पवार, सौ. विद्या सुखदेव, सीमा सुखदेव, शारदा सुखदेव, सुवर्णा सुखदेव, सविता सुखदेव, रेश्मा सुखदेव, माधुरी सुखदेव, सुषमा वासुदेव, पूनम कांबळे आदी उपस्थित होते.
याशिवाय ग्रामसेवक किरण जाधव, मनिषा पवार, अंगणवाडी सेविका व मदतनीस तसेच आरोग्य कर्मचारी आणि ग्रामस्थांनीही मोठ्या उत्साहात सहभाग घेतला.
या कार्यक्रमातून डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा जागर आणि सामाजिक समतेचा संदेश देण्यात आला.